आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाणे येथेभव्य सभा भरवण्यात आली. या सभेत जोरदार टोलेबाजी करत राज ठाकरेंनी पवार कुटुंबावर आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.
शरद पवार म्हणतात, मी जातीयवाद भडकवतो. शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसानं या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. शरद पवारांकडे अनेक घेण्यासारखे गुण आहेत. पण याचं काय करायचं?” असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
हे ही वाचा :भाजपला 2024 मध्ये तब्बल 400 जागा मिळतील; रामदास आठवलेंचा विश्वास
शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात”, असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, शरद पवार भूमिका मांडताना म्हणतात हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. पण त्याआधी आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शरद पवार कधीही तुम्हाला छत्रपतींचं नाव घेताना दिसणार नाही. छत्रपतींचं नाव घेतलं आणि मुसलमान मतं गेली तर काय करायचं? असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
रमजान ईदपर्यंत मस्जिदींवरील भोंगे उतरवा; राज ठाकरेंचं सरकारला आवाहन
“शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
ईडीच्या नोटीशीवर राज ठाकरेंनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…