“शरद पवारांना नोटीस आली अन् चित्रं बदललं, आता शिवसेनेलाही नोटीस आलीय, ईडीचा पायगुण चांगला, येऊ द्या नोटीसा”

0
169

पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या खासदार  सुप्रिया सुळे या मावळमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीकडून आलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना या आधी ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. आता शिवसेनेकडे ईडीची नोटीस आली आहे. आधीच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालंय. आता शिवसेनेला आणखी काही मोठं मिळणार असं दिसतंय. ईडीचा पायगुण चांगला आहे. येऊ द्या नोटीसा. सगळं चांगलं घडेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, आज राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक 1 वर्ष पूर्ण झालं आहे. सुरुवातीला सांगितलं हे सरकार 7 दिवस टिकेल. त्यानंतर 7 महिने टिकेल असं सांगितलं गेलं. आता तर 1 वर्ष झालं आहे. आता पुढची 5 वर्षेच काय 25 वर्षेही कधी उलटून जातील, हे कळणारही नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

“कोल्हापूरची भूमी सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटलांनी बारा वर्ष पाट्या टाकल्या”

“वर्षभरातील सरकारची कामगिरी शोभणारी नाही, जनता ठाकरे सरकारला नापास ठरवेल”

“बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळचा बोल्ड लूक व्हायरल”

फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचे सरकार आलं- सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here