आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
यानंतर राष्ट्रवादीत आता दोन गट पडले आहेत. एक शरद पवार गट, तर दुसरा अजित पवार गट. दोन्ही गटांकडून आज मुंबईत मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटांनी शक्तीप्रदर्शन केलं. बहुसंख्य आमदार अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित होते.
ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! सकाळी शरद पवारांच्या बैठकीला हजर राहणाऱ्याने ‘या’ आमदाराने दिला, अजित पवारांना पाठिंबा”
अजित पवारांच्या बैठकीला 32 तर शरद पवारांच्या बैठकीला 16 आमदार उपस्थित होते. त्यानंतर अजित पवारांनी थेट शरद पवारांवर टीका केली आणि त्यांच्या बदलत्या भूमिकेबाबतही भाष्य केलं. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी फुटल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
पक्षाचा ताबा घेणं लोकशाहीत अयोग्य आहे. पुलोद सरकार बनवलं होतं. विठ्ठल म्हणायचं आणि दुर्लक्ष झालं सांगायचं. अंतःकरणात पांडुरंगाचं नाव घ्यावं. बघून घेतो असं भुजबळांनी सांगितलं आणि शपथ घेतली. इतिहासात असा मुख्यमंत्री पाहिला नाही, असं अजित पवार म्हणाले होते. आज त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत बसले. राज्याच्या ऐक्याला सुरुंग लावायचं काम फडणवीसांनी केलं., असा आरोपही शरद पवारांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“अजित पवारांच्या शपथविधीच्या दिवशी नेमकं काय घडलं?; ‘या’ आमदाराने सांगितला सविस्तर घटनाक्रम”
अजित पवार यांच्यासोबत युतीनंतर भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सूर
अजित पवार यांची शरद पवारांवर पहिल्यांदाच टीका; म्हणाले, तुम्ही…