मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वशैलीवर शरद पवार यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. राहुल गांधी यांच्याकडे सातत्याचा अभाव असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांचं नेतृत्व पक्षानं स्विकारलं आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस पक्ष संघटीत होतो आहे. त्यांनी जिवनात जे दुःख पाहिलं, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही सावरत ते नेतृत्व करतायत. शरद पवार यांचं ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, परंतू ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं., असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, पुढील काळात राहुल गांधीच पक्षाचं समर्थपणे नेतृत्व करणार आहे, असा विश्वासही यावेळी बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी-
झोपेचं सोंग घेतलेल्या मोदी सरकारला जागं करण्यासाठी ‘भारत बंद’ महत्त्वाचा- अशोक चव्हाण
7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्त्वाचा आहे- बच्चू कडू
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनामुळं निधन
शेतकरी आक्रमक: उद्या 8 डिसेंबरला भारत बंदची हाक; उद्या फक्त ‘या’ सेवा राहणार सुरू