‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनामुळं निधन

0
388

मुंबई : अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं निधन झालं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिव्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरु असतानाच तिने अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे दिव्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री दिव्या गोरेगावच्या एसआरव्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झाली.

स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार, दिव्याच्या मृत्यूची माहिती तिचा जिवलग मित्र युवराज रघुवंशी यांनी दिली. युवराजने सांगितलं की, आज सकाळी 3 वाजता दिव्याचा मृत्यू झाला. रात्री 2 च्या सुमारास तिची प्रकृती अचानक खालावली. 3 वाजता डॉक्टर जेव्हा तिला तपासण्यासाठी आले तेव्हा तिचं निधन झालं असल्याची माहिती त्यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी-

शेतकरी आक्रमक: उद्या 8 डिसेंबरला भारत बंदची हाक; उद्या फक्त ‘या’ सेवा राहणार सुरू

साऊथ अभिनेत्री व काँग्रेस नेत्या एम.विजयाशांती भाजपमध्ये करणार प्रवेश; पंतप्रधान मोदींची तुलना केली होती दहशतवाद्यांशी

कुंफू पांड्याची मॅच विनिंग खेळी: भारताची ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी मात, भारताने मालिका जिंकली

मैथ्यू वेड-स्टीव्ह स्मिथची आक्रमक खेळी; ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 195 धावांचे लक्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here