आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
शिंदे गटातील आमदारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टार्गेट केलं. जेंव्हा जेंव्हा शिवसेना फुटली तेंव्हा तेंव्हा त्यामागे शरद पवार असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटातील आमदारांनी केला होता. यावरून आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याचं उत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : राज्यस्तरिय अबॅकस स्पर्धेमध्ये सांगलीने मारली बाजी
शिवसेना शरद पवारांनी संपवली का? या आरोपावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, आधी भाजपबरोबर सत्तेत होतो, तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असं सांगणारे हेच लोक गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधत आहात., असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
बंडखोरीआधी नेमकं काय घडलं?; उद्धव ठाकरेंनी केला खुलासा, म्हणाले…
तुम्ही रूग्णालयात असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता का?; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…