शरद पवारांमुळे मराठा आरक्षण मिळालं नाही, या सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचं नाही- गोपीचंद पडळकर

0
193

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. राज्य सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकरांनी यावेळी केला. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

दरम्यान, आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. पवार सत्तेत होते, मुख्यमंत्री होते, तेंव्हापासून आरक्षणाची मागणी होत आहे. पण मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं पवारांना कधीच वाटलं नाही. यावरून त्यांची भूमिका समजून येते, असा टोला पडळकरांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही”

“आम्ही परीक्षा रद्द केल्या की विरोध, केंद्राने रद्द केल्या तर स्वागत…”

राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची सहमती; म्हणाले…

एकनाथ खडसे, उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला; उदय सामंत यांनी दिलं भेटीबाबत स्पष्टीकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here