मुंबई : करोनाला रोखण्यासाठी राज्यासह देशभरात लॉकडाऊन जारी केला गेला, तरीही नागरिकांकडून त्याचे अद्याप गांभिर्याने पालन करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे
लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची सध्या गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरू नका, असे अनेक वेळा सांगण्यात येऊनही काही लोक रस्तावर येत आहेत. त्यामुळे इच्छा नसली तरीही पोलिसांना सुरूवातीला काही कठोर निर्णय घ्यावे लागले. त्यांचा परिणाम आज दिसतो आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
जनता घरातच थांबण्याच्या सूचना पळत असली तरीही काही 4 ते 5 टक्के लोक अजूनही चुकीचे वागत आहेत, त्यांच्यासाठी पोलिसांनी थोडी कठोर भूमिका घेतली आहे. पण आपल्याच सुरक्षेसाठी ती आपण सहन केली पाहिजे. पोलिसानींही परिस्थिती बदलत आहे हे लक्षात घेऊन आपल्या धोरणातत थोडा बदल केला पाहिजे, असंही शरद पावर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
महिला पत्रकाराला ट्रोल केलंय ते अतिशय निंदनीय ; रूपाली चाकणकर यांनी केला संताप व्यक्तhttps://t.co/Pg8cTynqvQ@dnyanada24 @ChakankarSpeaks
— घडामोडी (@ghadamodi1) March 27, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा; आता जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 24 तास खुली राहणारhttps://t.co/1rrmq8Q3it@CMOMaharashtra #CoronavirusLockdown
— घडामोडी (@ghadamodi1) March 26, 2020