Home महाराष्ट्र “शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य”

“शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य”

मुंबई : काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द केलं होतं. हे आरक्षण रद्द केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

ओबीसी नेेते छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर केंद्र सरकार इम्पेरिकल डाटा देत नसल्याची टीका ठाकरे सरकारनं केली होती. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दयावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलतात, त्याचबरोबर छगन भुजबळ देखील मोर्चे काढतात. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात काहीच बोलत नाहीत, त्यामुळे यातील कोणतरी झारीतील शुक्राचार्य आहे आणि त्यांना डिसेंबर 2022 पर्यंत आरक्षण द्यायचं नाही, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“अश्लिल चित्रपटाच्या चित्रीकरणावरून शिल्पा शेट्टीचे पती, प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा यांना अटक”

आम्हाला पुन्हा आषाढी वारीत तुडूंब भरलेलं पंढरपूर पहायचं आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“बा विठ्ठला, आमचे मुख्यमंत्री जसे स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच मंत्रालयातही जाऊ दे”; मनसेचा टोला

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे; मुख्यमंत्र्यांचं विठुरायाकडे साकडं