आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आरोग्य विभागातील पद भरतीसाठी 26 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
हॉल तिकिटात संबंधित एजन्सीच्या अनेक चुका समोर आल्या होत्या. त्यामुळे अखेर आरोग्य विभागाकडून ही परीक्षा रद्द करण्यात आली. यावरून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया देताना आरोग्य विभागातील परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत विद्यार्थ्यांची माफी मागितली. यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
राज्य सरकारने आरोग्य विभागाची परीक्षा जाहीर केली होती. त्यानंतर लाखो विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी फाॅर्म भरले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र आले, सेंटर ठरली. त्यात अनेकांचे सेंटर हे घरापासून लांब लाब आली होती. त्यामुळे अनेकांनी परीक्षेसाठी राहण्यासाठी खाण्यासाठी खर्च केला. मात्र महाराष्ट्रता चालणारं तीन तिघाडी काम बिघाडी सरकारने त्यांनी ऐनवेळी परीक्षा रद्द केली, असा घणाघात नववीत राणा यांनी केला.
दरम्यान, ठाकरे सरकारने परीक्षेच्या एक दिवस आधी रात्री 10 वाजता सांगितलं की, परीक्षा होणार नाही. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. लाज वाटली पाहिजे या सरकारला, आरोग्य विभागाला लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे, असा हल्लाबोल राणा यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
अखेर ठरलं! राज्यातील थिएटर्स ‘या’ तारखेपासून होणार सूरू; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय”
भाजपनेच ओबीसी व मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला- जयंत पाटील
‘धार्मिक स्थळे उघडून मोठे काहीतरी केल्याचा टेंभा मिरवू नका’; आशिष शेलारांची राज सरकारवर टीका