आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रंगत वाढतच चाललीय. अनेक राजकीय पक्षांचे नेते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. याच अनुषंगाने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज कराडमधील राजकीय नेत्यांची भेट घेतली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह उंडाळकर यांच्याशी कॅमेराबंद बैठकीनंतर पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला, मात्र उदयनराजे यांनी त्यांच्या स्टॉईलनेच उत्तरं दिली.
हे ही वाचा : भाजपचा काँग्रेसला धक्का; माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासह दोन आमदारांचा भाजपमध्ये प्रेवश
जिल्हा बँक निवडणुकीत आता मी ढवळाढवळ करू का, असा इशारा राष्ट्रवादी सह विरोधकांना देत मला कधी जिल्ह्यातल्या राजकारणात ढवळाढवळ करताना पाहिले का? पण माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, असं उदयन राजे म्हणाले आहेत.
दरम्यान, मी माझ्या बंधूंना गेली अनेक दिवस झाले सांगतोय मी तुमच्यासोबत आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही, असं म्हणत त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंनाही टोला लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
महिला सरपंचांना मिळणार ‘स्वर्गीय मीनाताई ठाकरे’ पुरस्कार
किरीट सोमय्यांविरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल; काँग्रेस नेत्याची माहिती
“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट, चर्चांना उधाण”