Home महाराष्ट्र भाजपचा काँग्रेसला धक्का; माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासह दोन आमदारांचा भाजपमध्ये प्रेवश

भाजपचा काँग्रेसला धक्का; माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासह दोन आमदारांचा भाजपमध्ये प्रेवश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : 2022च्या सुरुवातीला काही राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच भाजपने काँग्रेसला पंजाब, गोव्यापाठोपाठ आता मणिपूरमध्येही मोठा धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या आमदार असलेल्या मुलासह दोन आमदारांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

मणिपूरमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी भाजपची जोरदार तयारी चालू आहे. सोमवारी राजकुमार इमो सिंग आणि यामथाँग हाओकिप यांना पक्षात आणून भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला.

हे ही वाचा : महिला सरपंचांना मिळणार ‘स्वर्गीय मीनाताई ठाकरे’ पुरस्कार

सिंग हे मणिपूरमधील प्रसिद्ध  राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील राजकुमार जयचंद्र सिंग हे मणिपूरचे मुख्यमंत्री होते. तसेच राज्यातील पहिले केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल व मणिपूरचे प्रभारी संबित पात्रा यांच्या उपस्थितीत दोघांनी प्रवेश केला.

सिंग हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. पण पक्षविरोधात वक्तव्य केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप चांगले काम केले आहे. देशाचा सन्मान वाढविणे, शांतता आणि स्थैर्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत, असं सिंग म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्यांविरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल; काँग्रेस नेत्याची माहिती

“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट, चर्चांना उधाण”

“कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीला भारतीय संघाची विजयी भेट, नामिबियाचा 9 विकेट्सने केला पराभव”