आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं वारंवार सांगितलं जातं. राजकीय विरोधकांकडून तर या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका केली जाते. यावर आता वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार त्याकाळात वसंतदादांविरोधात वागले. मीही पवारांच्या विरोधात बोलायचं ते बोलले. शेवटी वसंतदादा राजकारण सोडून राज्यपाल व्हायला गेले. तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावून शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करा असं सांगितलं. म्हणजे वसंतदादांनाही शरद पवार हाच काँग्रेसमधील योग्य नेता दिसला. त्यांनी स्वत: सांगितलं त्यांच्या नेतृत्वात काम करा, असं शालिनीताई पाटील म्हणाल्या आहेत.
ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचे आमदारही फुटणार; गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट
अजित पवारांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसलं असं म्हणणार नाही. पण अजितने शरद पवार यांना विचारायला हवं होतं. सल्ला घ्यायला हवा होता. सख्ख्या काकाला सोडून रात्रीच्या अंधारात शपथ घेतात, ते उद्या भाजपचा विश्वासघात करणार नाही का? काकांचा विश्वासघात करतात ते दुसऱ्यांचा का करणार नाही? असा सवालही शालिनीताई पाटील यांनी यावेळी केला.
दरम्यान, शरद पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला. आज पेरलं तेच उगवलं असं वाटतं का? असा प्रश्न शालिनीताईंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसेचा मुंबईतील एकमेव नगरसेवकचा पक्षाला राम
“महाराष्ट्राचा इतिहास दबावाखाली बाजू बदलणाऱ्या, खंडोजी खोपडेंचा नाही तर…; “
भाजपला मोठा धक्का; चार माजी नगरसेवकांसह पाचशे कार्यकर्ते बीआरएसमध्ये दाखल