Home महाराष्ट्र बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम; शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम; शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

मुंबई : ट्रॅक्टर रॅलीदरम्यान पोलीस आणि शेतकरी यांच्यात झालेल्या वादानंतर पोलिस आक्रमक झाले असून पोलिसांनी लाठीचार सुरू केला. यानंतर वातावरण आणखी तापलं. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर टीका केली आहे.

दिल्लीत 20 ते 25 हजार ट्रॅक्टर येतील, हे माहीत होते. अशावेळी त्यांच्याशी चर्चा करून हे वेळीच थांबवायला हवे होते. मात्र त्यांची दखल घ्यायचीच नाही, हे ठरविल्यामुळे असे झाले. दिल्लीत आज जे घडत आहे, त्याचे समर्थन कुणीही करणार नाही. पण वातावरण का बिघडले याचा विचार करायला हवा., असं म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

बळाचा वापर करून जर आंदोलन चिरडले तर त्याचे परिणाम गंभीर होतील. कारण आपण अशांत पंजाब पाहिला आहे, तसे पुन्हा घडू देण्याचे पातक मोदी सरकारने करू नये, असं म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.


महत्वाच्या घडामोडी-

रेणू शर्माने बलात्काराची केस मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दोन महिन्यात 104 पेक्षा जास्त शेतकरी हुतात्मे झाले, लाज वाटली पाहिजे; भाई जगताप कडाडले

“आंदोलक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांची संपत्ती जप्त करा”

शेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान मोदी जबाबदार- पृथ्वीराज चव्हाण