Home महाराष्ट्र शेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान मोदी जबाबदार- पृथ्वीराज चव्हाण

शेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान मोदी जबाबदार- पृथ्वीराज चव्हाण

कराड : दिल्ली येथे सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक होण्याला संपूर्णपणे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत, असं म्हणत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

बऱ्याच वाटाघाटीनंतर शेतकऱ्यांना टॅक्टर रॅली काढण्याची परवानगी देण्यात आली. परंतु किती वाजता ती सुरू होईल आणि त्यांना कोणत्या वेळी ती काढता येईल यावरून वाद झालेत. अश्रुधुराचा वापर केला गेला, लाठीचार्जही करण्यात आला हे अत्यंत दुर्दैवी आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींची ही आडमुठी भूमिका आहे., असं म्हणत चव्हाणांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, या घटनेची मी तीव्र शब्दात निंदा करत असून, मोदी सरकारने हटवादीपणा सोडून कृषी विधेयक मागे घ्यावीत, अशी मागणी चव्हाणांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी-

“BREAKING NEWS! शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील काही भागातील इंटरनेट सेवा बंद”

दिल्लीतील आंदोलनात शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू

“घरी बसून दुसऱ्याची मापं काढत बसलात तर लोकं कायमस्वरूपीच घरी बसवतील”

“विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देऊ”