आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य सरकारकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मात्र, वाढवलेली सुरक्षा पाहून मनसे नेते बाळ नांदगावकर यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
‘राज यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक इन्सेक्टर आणि एक पोलिस वाढीव देण्यात आला आहे. मग कशाला सुरक्षा देताय? थट्टा सुरु आहे काय?. त्यापेक्षा सुरक्षा देऊच नका. सरकार म्हणून निर्णय घ्यायची आवश्यकता आहे,, असा आक्रमक पवित्रा बाळा नांदगावकरांनी यावेळी घेतला.
हे ही वाचा : राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी- रामदास आठवले
मी जेव्हा आज राज ठाकरेंच्या घरी गेलो, तेव्हा एक पोलिस इन्स्पेक्टर आणि पोलिस कर्मचारी सुरक्षेसाठी दिला आहे. मग कशाला सुरक्षा देताय? थट्टा सुरु आहे का?. त्यापेक्षा सुरक्षा देऊच नका. सरकार म्हणून निर्णय घ्यायची आवश्यकता आहे., असं नांदगावकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी- रामदास आठवले
“भाजपची यशस्वी खेळी; राष्ट्रवादी आणि मनसेच्या ‘या’ नेत्यांनी हाती घेतलं कमळ”
‘भाजप हा लिमिटेड लोकांचा पक्ष’; भाजपच्या माजी आमदाराचा पक्षाला घरचा आहेर