आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज 20 जूनला एक वर्ष पूर्ण होत आहे. हे बंड फसलं असतं तर एकनाथ शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवलं असतं, असं मोठं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं आहे. दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ही बातमी पण वाचा : “राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?; ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ”
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी केलेलं आहे. गद्दार कुणाला म्हणता? मी असा मनुष्य बघितलाय, मी आजपर्यंत मीडियासमोर कधी बोललो नव्हतो. माझे एकनाथ शिंदे यांच्यासोबत अत्यंत जवळचे संबंध आहेत. ते समजा रागून निघून गेले होते, तर त्यांनी परत येण्याची तयार दाखवलेली होती”, असंही दीपक केसरकर म्हणाले.
दरम्यान, केसरकर यांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
चुंबन पोझमध्ये फोटो काढताना नवऱ्याचा संयम सुटला, अन् …
“काँग्रेसनं काढला विधानसभेच्या पराभवाचा वचपा, घरच्या मैदानावर, विखे पाटलांना मोठा धक्का”
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनीषा कायंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांनी…