Home महाराष्ट्र “विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराच्या नावावर शिक्कामोर्तब”

“विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराच्या नावावर शिक्कामोर्तब”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : येत्या 28 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. 27 डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी 4 मोठी नावं चर्चेत आहेत. त्यापैकी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

हे ही वाचा : “तेंव्हा बघ्यांची भूमिका घेणारे फडणवीस सभागृहात मोदींची नक्कल होताच तडफनीस झाले”

नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. मात्र, हे पद कुणाला द्यायचं हे ठरत नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली होती. सध्या या पदासाठी काँग्रेसमधून चार नावे पुढे आली आहेत. भोरचे आमदार संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीतून नापसंती आहे. तसेच अशोक चव्हाण या पदासाठी इच्छूक नसल्याचं समजतंय. तर नितीन राऊत यांनाही ऊर्जा खातं सोडायचं नसल्यानं अखेर संग्राम थोपटे यांच्या नावावर पक्षातून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या 27 डिसेंबर रोजी थोपटे अर्ज भरणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

रात्री लाॅकडाऊन करण्याची चर्चा देश पातळीवर चालू आहे; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत

काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज; उदयनराजेंचा गाण्यातून शिवेंद्राराजेंना टोला

मी लवकरच ‘या’ पक्षाची स्थापना करणार; करूणा शर्मांची मोठी घोषणा