मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ऑनलाईन शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 1 मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली असून 1 ते 13 जून असा हा सुट्टीचा कालावधी असणार आहे. यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन शाळेतून सुट्टी मिळाली आहे, असं शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी कळवलं आहे.
दरम्यान, 1 मे 2021 ते 13 जून 2021 पर्यंत उन्हाळी सुट्टीचा कालावधी असणार आहे. तसेच पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये 14 जून 2021 रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात पण विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार 28 जून 2021 रोजी शाळा सुरू होतील, असं सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
सरकारला चूक कळली, राज ठाकरेंची ‘ती’ मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली मान्य
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी सांगा गरिबांनी जगायचं कस?; भाजपचा सवाल
“युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील?”