आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेसचे नाशिक पदवीधरचे आमदार सुधीर तांबे यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तांबेंच्या बंडखोरीवर काँग्रेसने नाराजी व्यक्त करत पाठींबा देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.
या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची कोंडी दूर केली असून, महाविकास आघाडीतर्फे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे.
हे ही वाचा : …तर पंकजा मुंडेंचं शिवसेनेत स्वागत आहे; ठाकरे गटाच्या आमदाराचं सूचक विधान
शुभांगी पाटील यांनी नाशिक विधान परिषद पदवीधर मतदार संघ निवडणुकीतून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने त्या निवडणूक लढवतील, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
बहीण- भाऊ पुन्हा एकत्र; पंकजा मुंडे पोहचल्या ब्रीच कँडी रूग्णालयात, भाऊ धनंजय मुंडेंना म्हणाल्या…
“अपघातांच्या मालिका सूरूच; आमदार बच्चू कडूंचा अपघात, उपचारासाठी रूग्णालयात दाखल”