Home महाराष्ट्र …तर पंकजा मुंडेंचं शिवसेनेत स्वागत आहे; ठाकरे गटाच्या आमदाराचं सूचक विधान

…तर पंकजा मुंडेंचं शिवसेनेत स्वागत आहे; ठाकरे गटाच्या आमदाराचं सूचक विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यांनी अनेकदा आपण पक्षात नाराज नसल्याचं म्हटलं आहे. यावरून आता ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी एक मोठं विधान केलं आहे.

पंकजा मुंडेच्या नाराजीबद्दल बोलताना, पंकजा मुंडे यांचं शिवसेनेत स्वागत आहे, असं सुनील शिंदे यांनी म्हटलं आहे. आमदार सुनील शिंदे हे पाथर्डी दाैऱ्यावर आहेत. पाथर्डी येथे विविध ठिकाणी शिंदे यांनी शिवसेनेच्या शाखांचं उद्घाटन केलं. यावेळी  पत्रकारांशी बोलताना, त्यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : “राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; प्रकाश आंबेडकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त बैठक, मध्यरात्री अडीच तास खलबतं, चर्चांना उधाण”

पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे त्यांचं मत आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. पण पंकजा मुंडे भाजपच्या फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्यावर अन्याय होतोय, हे आम्हाला दिसतंय. पण त्या आणि त्यांच्या पक्षातील हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी काहीही बोलणार नाही. पण त्यांच्या कर्तुत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे यांचं शिवसेना पक्षात स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

बहीण- भाऊ पुन्हा एकत्र; पंकजा मुंडे पोहचल्या ब्रीच कँडी रूग्णालयात, भाऊ धनंजय मुंडेंना म्हणाल्या…

“अपघातांच्या मालिका सूरूच; आमदार बच्चू कडूंचा अपघात, उपचारासाठी रूग्णालयात दाखल”

“शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला खिंडार, ‘या’ महिला नेत्यानं केला बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश”