सिंधुदुर्ग : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांचं भुयारी गटार कलानगरकडे जातं. ईडीचा तपास अजून खोलवर झाला तर बरोबर कलानगरमध्ये पोहोचतील. चुकीचं काही झालं असेल म्हणूनच ईडीने कारवाई केली आहे., असं नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, प्रताप सरनाईक आणि रविंद्र वायकर हा एक मुखवटा झाला. त्याचा मागचा कलाकार जो आहे तो कलानगरमध्ये बसला आहे, असं म्हणत नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
प्रताप सरनाईक काही साधुसंत नाही; सरनाईकांच्या घरावर ईडीच्या छापेमारीनंतर राणेंचा निशाणा
आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या- संजय राऊत
“शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीचे छापे”
“‘दि अंडरटेकर’ ची WWE मधून निवृत्ती”