समृद्धी महामार्गावरील अपघातावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले..’समृद्धी महामार्ग शापित आहे, कारण…

0
512

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बुलढाण्यात मध्यरात्री खासगी बसचा अपघात झाला. या अपघातानंतर लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा येथे हा अपघात झाला. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

समृद्धी महामार्ग शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला याच्या खोलात जावं लागेल. तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने मनमानी केली. याबाबत अनेक गोष्टी आहेत. त्या भविष्यात समोर येतील, पण दुर्दैवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, वारंवार मृत्यू होत आहेत. हे काही चांगलं नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ते शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : खोटं बोला पण रेटून बोला हे फडणवीसांचं धोरण; राष्ट्रवादीची टीका

कितीवेळा श्रद्धांजल्या वाहायच्या. आम्ही अनेकदा समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादेची मागणी केली आहे. त्याविषयी काहीच होत नाही. तो रस्ता भ्रष्टाचारातून तयार झाला आहे. त्या रस्त्यासाठी अनेकांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. जबरदस्तीने जमिनी घेण्यात आल्या. त्या रस्त्याला अनेकांचे शाप आहेत आणि त्या रस्त्यात मला अनेकांचे अश्रू दिसत आहेत, अंसही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्यांवर संकट?; थेट मंत्रीमंडळातून मिळणार डच्चू”

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत…; पंकजा मुंडे यांचा एल्गार

“वरात दारात येऊन थांबली, अन् नवरी मुलीने दिला लग्नाला नकार; कारण वाचून थक्क व्हाल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here