आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : संजय राऊत यांच्या एका आक्षेपार्ह शब्दावरुन त्यांच्याविरोधात राजनाधी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊतांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक उतरले आहेत.
योगी आदित्यनाथ यांनीही त्या शब्ताचा वापर केला होता. त्यामुळे आता त्यांच्यावर भाजप कधी गुन्हा दाखल करणार हा प्रश्न आहे. माझं आवाहन आहे की ज्या पत्रकाराला त्यांनी शब्द वापरला त्याने याविरोधात तक्रार दाखल करावी, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
हे ही वाचा : मनसेच्या होर्डिंगवर ‘जय श्रीराम’; राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी औरंगाबाद शहरभर बॅनरबाजी
दरम्यान, शरद पवारांना खुर्ची देतानाच्या संजय राऊत यांच्या फोटोवरुन भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राऊतांनी एका आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. मात्र, त्या शब्दाचा अर्थ मूर्ख असा होत असल्याचा दावा राऊत करतात. मात्र, या शब्दप्रयोगावरुनच त्यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिस भाषा को लेकर संजय राऊत जी पर एफआयआर दर्ज हुआ उस भाषा के प्रयोग पर योगी जी पे एफआयआर कब दर्ज होगा|#एक देश दो कानून pic.twitter.com/MFtYguyrkT
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 13, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“…अन् त्याने प्रियसीचे जुने फोटो व्हॉट्सअपला ठेवून केली बदनामी”
म्हाडा पेपरफुटी प्रकरणावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
तुम्ही हिंदू आहात तर…; चंद्रकांत पाटलांचं राहुल गांधींना आव्हान