आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहारात ईडीच्या रडारवर असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल 102 दिवसांनी जामिनावर सुटका झाली. यानंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत, शिवसेनेत गट तट नसून, शिवसेना एकत्रच असल्याचं म्हटलं होतं. यावर आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना ही एकत्रच आहे. बाळासांहेबांची शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे विचार एकत्रच आहे. उद्धव ठाकरे जे म्हणतात तेच एकनाथ शिंदे म्हणतात. बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आम्ही राज्यात काम करतोय., असं गुलाबराव पाटील म्हणाले.
हे ही वाचा : खानाच्या कबरीवरील कारवाईचं संभाजीराजेंकडून स्वागत, म्हणाले…
दरम्यान, तसेच शिवसेनाप्रमुखांना आवडेल, असंच ही शिवसेना करणार आहे. महाराष्ट्रभर शिवसेना प्रमुखांची शिवसेना म्हणून काम करतोय, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
स्वत:ची तुलना सावरकर-लोकमान्यांशी, मात्र त्यांनी…; मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
“ठाकरे गटात इनकमिंग सूरूच; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”