संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर; भेटीचं कारण काय? चर्चांना उधाण

0
381

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. संजय राऊत दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. सकाळी 9 च्या दरम्यान संजय राऊत पवारांच्या सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत.

हे ही वाचा : आता मी ढवळाढवळ करू का?; उदयनराजेंचा थेट राष्ट्रवादीसह विरोधकांना इशारा

शरद पवार आणि कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून राऊत दीपावलीच्या शुभेच्छा देतील. दीपावलीच्या काळात शरद पवार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय बारामतीला होते. त्यामुळे दिवाळीच्या काळात राऊतांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देता आल्या नाहीत. पवार आता मुंबईत आलेले आहेत. त्यामुळे संजय राऊत सिल्वर ओकवर दाखल झाले. या भेटीत इतरही राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या भेटीत इतरही राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. कारण आर्यन खान प्रकरणावरती नबाव मलिक यांनी ट्रेलर दाखवला. आता त्याची पुढची पटकथा मी सांगणार, असं संजय राऊत म्हणाले होते. आता राऊत आज पवारांची भेट घेत आहेत. या भेटीत आर्यन खान प्रकरणावरतीही चर्चा होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपचा काँग्रेसला धक्का; माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासह दोन आमदारांचा भाजपमध्ये प्रेवश

महिला सरपंचांना मिळणार ‘स्वर्गीय मीनाताई ठाकरे’ पुरस्कार

किरीट सोमय्यांविरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल; काँग्रेस नेत्याची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here