आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना धारेवर धरलं आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही त्यांनी मनी लाॅंडरिंगचे आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमय्या आज कोल्हापूर दाैऱ्यावर आहेत.
मुश्रीफ यांच्याविरोधात सोमय्या कागल तालुक्यातील मुरगुड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उचलला त्यावेळी राऊत यांनी ईडीला 55 लाख दिले, शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावे, असा सल्ला सोमय्या यांनी दिला. तसेच भाजप आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आनंदराव अडसूळ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं.
दरम्यान, पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून घेतलेलं बिनव्याजी 55 लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी परत केलं होतं. तसे ईडीने चाैकशीसाठी समन्स पाठविल्यानंतर वर्षा राऊत यांनी हा निर्णय घेतला.
महत्वाच्या घडामोडी –
…तर 2024 ला राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल; जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास
जळगावात भाजपला मोठा धक्का; तब्बल 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून सुरु होणार राज्यातल्या शाळा
सोमय्यांची अडवणूक करू नका, त्यांना कोल्हापूरला येऊ द्या; हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन