आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी परवा दिवशी मतदान झालं. या निवडणूकीत भाजपनं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. या निकालावरून आता भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : ‘…या ठिकाणी झाली भाजप- मनसेची पहिली युती’; राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या सोसायटीवर मिळविली सत्ता
काही पुढारी विकले गेले, परंतु कोल्हापुरातील जनता विकली जाणार नाही,तुमच्या पाठीशी राहील.
2024 ला कोल्हापुरातून संजय पवार आमदार असतील, फक्त यावेळी शिवसेनेने त्यांना विधानसभेला तिकीट देणे गरजेचे आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेतून राज्यसभेच्या तिकिटाची लॉटरी लागली, विजयी धनंजय महाडिक झाले पण चर्चेत मात्र अजूनही संजय पवारच आहेत, असं तृप्ती देसाई यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
आम्ही म्हणतोय ना तुम्हाला स्वयंघोषीत हिंदुजननायक मग…; दिपाली सय्यद यांचा मनसेला टोला
वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा; अमृता फडणवीसांची मागणी