Home महाराष्ट्र सांगलीच्या पालकमंत्र्यांना सत्तेचा माज; गोपीचंद पडळकरांचा घणाघात

सांगलीच्या पालकमंत्र्यांना सत्तेचा माज; गोपीचंद पडळकरांचा घणाघात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसेच सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

सांगली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात किती पैसे खर्च करण्यात आले याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. तसेच नियोजन समितीच्या बैठकीत एका आमदाराला एक, एका आमदाराला एक न्याय का असे विचारले असता. तर आम्ही बघतो पाहतो, असे टोलवाटोलवीचे उत्तर पालकमंत्री देतात. खरं तर पालकमंत्री जयंत पाटील यांना सत्तेचा माज आणि मस्ती असल्याने ते आमच्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकरांनी यावेळी केला.

सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील, मंत्री विश्वजित कदम, खासदार आमदार शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, महाआघाडीच्या नेत्यांना, आमदारांना विकास कामांसाठी जास्त पैसे दिले जात आहेत. मात्र, आम्हाला कमी दिले जातात, असा आरोप करत पडळकर या बैठकीतून बाहेर पडले. तसेच पालकमंत्री आणि या बैठकीचा पडळकरांनी यांनी निषेध केला.

महत्वाच्या घडामोडी –

अजितदादांच्या नातलगांच्या कारवाईमागचे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीस; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा आरोप

“नवाब मलिक हे कचरा किंग आहेत, त्यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल करणार”

“महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी उतरणार”

राज ठाकरेंची पुण्यात मोठी रणनीती; पुणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेविका वनिता वागस्कर यांची नियुक्ती