आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : कोल्हापूर येथील वडगावमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये सांगलीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या स्पर्धेमध्ये सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्याचे विदयार्थी सहभाग झाले होते. यामध्ये महाराष्ट्र राज्यामधून जवळपास 700 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये सांगलीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
यावेळी मुख्य प्रमुख पाहुणे . पी. एस.आय गिरीश शिंदे (वडगाव पोलीस ठाणे.) प्रमुख प्राचार्य डी. एस. घुगरे (प्राचार्य गुरुकुल अकॅडमी, मिनचे) एस. ए. परिड (उपप्राचार्य आदर्श विद्यानिकेतन, मिनचे) डी. के पाटील ( प्राचार्य वडगाव विद्यालय वडगाव) महेश पोळ (जिनीयस इंग्लिश मिडियम स्कूल, वडगाव.) संदीप आवटी (नगराध्य मिरज)आदी उपस्थित होते.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
या स्पर्धेत सोहम जुमराणी या विद्यार्थ्याला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तर वेदांत आनंदे, वैष्णव नाईक, आदित्य गुरव, अमेय पाटणकर, युविका नेमाणी, तनिष्का फराटे, इश्वरी गिड्डे, या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफी मिळाली. तसेच, जयवर्धन पतंगे, गौरी पाटील, सिद्धांत आनंदे, अनुश्री रेवनकर, दिव्या सावळे अनुश्री ऐतवडेकर, श्रवण दाईगंडे, श्रुतीका भूतेकर, स्वरा नारकर, सौरभ शंभूवाणी, पियुष ताटे, मंथन जुमराणी अथर्व चौगुले, नमन खाडे, अनन्या पाटील या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
दरम्यान, सांगली शाखा प्रमुख आफरिन रंगरेज आणि श्वेता शिकलगार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
महत्त्वाच्या घडामोडी –
बंडखोरीआधी नेमकं काय घडलं?; उद्धव ठाकरेंनी केला खुलासा, म्हणाले…
तुम्ही रूग्णालयात असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता का?; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल