“सांगली हादरली; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, 8 गोळ्या झाडून हल्लेखोर पसार”

0
739

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सांगलीत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

सांगलीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. गंभीर अवस्थेतच त्यांना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याची शेकडो कार्यकर्त्यांसह घरवापसी

नालासाब मुल्ला यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडण्यात आल्या. शहरातील 100 फुटी रोडजवळ ही घटना घडली आहे. नालासाब मुल्ला यांच्या राहत्या घराजवळच अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्याचे कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, गोळीबार होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे आणि विश्रामबाग पोलीस दाखल घटनास्थळी दाखल झाले. मुल्ला यांच्यावर हा हल्ला का करण्यात आला? याचा तपास पोलीस करत आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“…तर १९९६ सालीच शरद पवार पंतप्रधान झाले असते”

“अजित पवारांचा कट्टर समर्थक शिंदेंच्या गळाला?, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली ‘या’ आमदाराची भेट, चर्चांना उधाण”

“मोठी बातमी! शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांचा सोबत प्रवास, चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here