Home महाराष्ट्र सांगलीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का; काँग्रेसच्या सांगली जिल्हा महिला अध्यक्षा राष्ट्रवादीच्या वाटेवर

सांगलीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का; काँग्रेसच्या सांगली जिल्हा महिला अध्यक्षा राष्ट्रवादीच्या वाटेवर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाच्या मिरजेतील ज्येष्ठ नगरसेविका वहिदा नायकवडी यांनी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान त्यांचे पती माजी नगरसेवक अय्याज नायकवडी यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाही आज राजीनामा दिला.

सांगली महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अय्याज नायकवडी यांनी वहिदा नायकवडी यांना संधी देण्याची मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडे केली होती. मात्र,त्यांच्या मागणीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर अय्याज नायकवडी यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर, धोरणावर आमचा पूर्ण विश्वास आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील तीन कुटुंबामध्येच काँग्रेसचे विभाजन झाले आहे. मुस्लिम समाजाचा मतांचा एकगठ्ठा म्हणून केवळ वापर केला जात आहे. महापालिका, महामंडळ, समित्या, पक्षांची पदे यामध्ये समाजास जाणीवपूर्वक डावलले जात आहे. सग्यासोयऱ्यांना पदे द्यायचे, हे स्थानिक नेत्यांचे धोरण पक्षाच्या प्रगतीला बाधित करत आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अल्पसंख्याक समाजाची किंमत आहे. मात्र, स्थानिक नेत्यांना नाही. काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करूनही न्याय मिळत नसल्याने आम्ही पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आहे, असं अय्याज नायकवडी  म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

आमदार रवी राणा यांची आमदारकी जाणार?; रवी राणांची प्रतिक्रिया, म्हणाले…

आगामी 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच विजयी होईल; ‘या’ ज्येष्ठ नेत्यानं केला दावा

शिवसेना निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं पैसा गोळा करते; मनसेचा धक्कादायक आरोप

“महाविकास आघाडी सरकारला येणाऱ्या काळात सळो की पळो करुन सोडू”