सांगली : सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या महापौर संगिता खोत आणि उपमहापौर धिरज सुर्यवंशी यांनी काल महापालिकेच्या महासभेत राजीनामा दिला.
संगिता खोत यांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे महापौर आणि उपमहापौर यांनी राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा दिल्यानंतर महापौर संगिता खोत यांना अश्रू अनावर झाले. त्या महासभेत बोलताना अचानक रडू लागल्या.
चंद्रकांत पाटील यांनी स्वत: फोन करून महापौर आणि उपमहापौर यांना महापालिकेच्या सभेत राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मात्र महापौरांनी आणखी काही दिवसांचा कालावधी देण्याची विनंती केली होती. मात्र पक्षाने ही मागणी फेटाळून लावली.
महत्वाच्या घडामोडी-
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने रोहित आणि विराटचं कौतुक
शिवसेनेने आम्हाला तशी कोणतीही ऑफर दिली नव्हती- नवाब मलिक
…म्हणून झाली उर्वशी रौतेला ट्रोल
गेली सात वर्षे मी सर्व सहन केलं; धनंजय मुंडे झाले भावूक