मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सांगली, सातारा, कोल्हापूरला पावसाने चांगलंच झोडपलं आहे. तसेच या 3 जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीतील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली.
सांगली जिल्ह्यातील भिलवडी परिसरामधील पूरग्रस्त भागाला, स्थलांतरितांच्या निवारा केंद्रांना अजित पवारांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सभोवतालच्या परिसराची पाहणी केली. तसेच त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे ? याबाबत अजित पवारांनी माहिती घेतली.
भिलवडी येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. पाणी भरलेल्या बाजारपेठेची बोटीतून पाहणी केली. तसेच भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन अजित पवारांनी दिलं. तसेच संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, असा विश्वास अजित पवारांनी यावेळी दिला.
दरम्यान, सांगली शहरातील पुरानं बाधित स्टेशन चौक परिसराला अजित पवारांनी भेट दिली. तसेच स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शहराला वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना राबवण्याबाबत चर्चा केली.
महत्वाच्या घडामोडी –
“मत मागायला याल, तेंव्हा कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”
ओबीसींबद्दल केंद्राला राग, समाजाचे नुकसान करण्याचं केंद्र सरकारचं षडयंत्र
“मोठी बातमी! कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा”
भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या आणि दशावतारातील शंकासुरच; नितेश राणेंचा घणाघात