काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याकडून संघ आणि भाजपचं कौतुक

0
408

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह गृहमंत्री अमित शाह आणि संघाची स्तुती केली आहे. दिग्विजय सिंह यांचं नर्मदा परिक्रमा यात्रेवरील पुस्तक प्रकाशित झालं,  या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दिग्विजय सिंह बोलत होते.

या नर्मदा परिक्रमेदरम्यान मला सरकार आणि संघाचं भरपूर सहकार्य मिळालं. हेच नाही तर ज्या अमित शाह आणि संघाचा मी सर्वात मोठा टीकाकार आहे, त्यांनी केलेलं सहकार्य विसरु शकत नाही असं दिग्विजय सिंह म्हणाले आहेत.

नर्मदा यात्रेदरम्यान अमित शाहा यांनी वन अधिकाऱ्यांना सांगून माझी व्यवस्था शासकीय विश्रामगृहात केली. मी त्यांचा सर्वात मोठा टीकाकार असुनही,त्यांनी माझी पूर्ण काळजी घेतली, माझ्या नर्मदा यात्रेत त्यांनी कुठलाही अडथळा येऊ दिला नाही. पुढे ते म्हणाले की,’ मी अमित शाहा यांना समोरासमोर कधीही भेटलेलो नाही, पण तरीही त्यांनी केलेल्या सहकार्यासाठी मी गृहमंत्र्यांचे आभार मानतो’, असं म्हणत दिग्विजय सिंह यांनी आभार व्यक्त केले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेसोबत राज्य स्तरावर युती; चंद्रकांत पाटलांचं मोठ वक्तव्य

नागपुरात शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; समर्थकांसह पदाधिकाऱ्याचा शिवसेनेत प्रवेश

खड्ड्यात गेलेल्या पक्षानं आम्हांला खड्ड्यात घालण्याची भाषा करू नये; शिवसेनेचा पलटवार

राज ठाकरेंनी मागणी करून काही मोठं काम केलं नाही- गुलाबराव पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here