Home महाराष्ट्र “सांगलीकरांच्या चिंतेत वाढ! कृष्णेची पाणी पातळी वाढणार, पुढच्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज”

“सांगलीकरांच्या चिंतेत वाढ! कृष्णेची पाणी पातळी वाढणार, पुढच्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज”

सांगली : गेल्या काही दिवसांपासून सांगली, सातारा, कोल्हापूरला पावसाने चांगलंच झोडपलं. तसेच या 3 जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसानं आता विश्रांती घेतली आहे. मात्र पुढील काही दिवसांत राज्यात मोठा पाऊस पडणार, अशा बातम्या समोर येत आहेत. तसेच सांगलीतही जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. यावर सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

सांगली येथे कृष्णा नदीचा पूर ओसरून पाणी पातळी ४० फुट इतकी सुरक्षित झाली आहे . ती आणखी कमी होत आहे . सध्या कोयना धरणात पाणी साठा ९० टीएमसी असून (८७%) धरणातून ३०००० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. ., असं जयंत पाटील म्हणाले.

पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज असून धरणातून पाणी विसर्ग थोडासा वाढवून पाणी साठा कमी केल्यास मोठ्या पावसाच्या कालावधीत विसर्ग नियंत्रित ठेवतां येईल . त्यामुळे कोयना धरणातून सद्याचा ३०००० विसर्ग थोडासा वाढवून ५०००० क्यूसेक्स करण्याचे नियोजन आहे , असंही जयंत पाटलांनी यावेळी म्हटलं.

तसेच सांगली येथे कृष्णा नदीची पातळी काही प्रमाणात वाढेल, परंतू घाबरण्याचे कारण नाही. मोठा पाऊस जर आला तर तो धरणांतच अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. नागरीकांनी काळजी करू नये., असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाहीत, बैल मुततो तशा भूमिका बदलत नाही- राज ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मला कायम सुसंस्कृतपणा आणि संयमीपणा दिसला- अमोल कोल्हे

“अभिमानास्पद! पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री दिपाली सय्यदकडून तब्बल 10 कोटींची मदत”

मी काय राज कुंद्रा आहे का?; राज ठाकरेंचा खोचक सवाल