Home देश उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मला कायम सुसंस्कृतपणा आणि संयमीपणा दिसला- अमोल कोल्हे

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मला कायम सुसंस्कृतपणा आणि संयमीपणा दिसला- अमोल कोल्हे

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस नुकताच पार पडला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. यावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांनी जो आशावाद व्यक्त केला आहे, त्या बद्दल त्यांना शुभेच्छा… पण सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका आणि राष्ट्रवादीसह पक्षेश्रष्ठींची भूमिका काय असेल हे माहिती नाही पण ती महत्त्वाची असेल, असं अमोल कोल्हे म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल आशावादी असायला काहीच हरकत नाही. कोणतीही मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी बसली तर प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमानच असेल, आनंदच होईल…, असं अमोल कोल्हे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मला कायम सुसंस्कृतपणा आणि संयमीपणा दिसला आहे, असंही अमोल कोल्हेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“अभिमानास्पद! पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री दिपाली सय्यदकडून तब्बल 10 कोटींची मदत”

मी काय राज कुंद्रा आहे का?; राज ठाकरेंचा खोचक सवाल

‘माझी प्रकृती उत्तम, काळजीचं कारण नाही’; जयंत पाटलांनी दिली माहिती

पुरग्रस्तांचे हाल बघून उर्मिला मातोंडकरांना झाले अश्रू अनावर; केली ‘ही’ मदत