समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार; नवाब मलिकांचा इशारा

0
287

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना इशारा दिलाय. समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार, असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल, तुझा तुरुंगवास निश्चित आहे, असं वक्तव्य मलिक यांनी जाहीर कार्यक्रमात केलंय. मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : आजचा दिवस राष्ट्रवादी पक्षासाठी लाभदायी; गुहागर नगराध्यक्षांसह असंख्य समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल. तुझा तुरुंगवास निश्चित आहे. राज्यातील जनता पाहतेय. वानखेडेची बोगसगिरी जनतेसमोर आणणार. त्याचा बाप बोगस होता, हा बोगस आहे, याच्या घरातील सगळे बोगस आहेत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो की यात माझं काही नाही. माझ्यावर दबाव होता. मग तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या बापाचं नाव सांग. कोणत्या बापाच्या सांगण्यावरुन हे करतोय? तुझा बाप कोण याचं उत्तर दे. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही’, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्ष मिळाला! रूपाली चाकणकर यांची नियुक्ती

“हार की प्रहार? प्रहार मधील प्र कधीच निघून गेलाय, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुखपत्राचं नाव हार ठेवावं”

भास्कर जाधव शेतामध्ये एखादं बुजगावणं असतं तसं…; प्रवीण दरेकरांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here