आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान केसचा तपास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ अधिकारी संजय सिंह करणार आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सूचक ट्विट केले आहे.
हे ही वाचा : राष्ट्रवादीचे नागपूर मिशन; शिवसेनेतून आलेल्या नेत्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
समीर वानखेडेंना आर्यन खानच्या प्रकरणासोबतच एकूण पाच प्रकरणांच्या तपासातून हटवण्यात आलं आहे. अशी एकूण 26 प्रकरणं आहेत ज्यांचा तपास होणं आवश्यक आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी खूप काही करण्याची गरज आहे. आणि आम्ही ते करू.’ असं ट नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
दरमयान, गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्जप्रकरणावरून नवाब मलिक यांनी एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार टीका सुरू केली होती. समीर वानखेडे या प्रकरणाचा तपास हेतुपुरस्सर विशिष्ट पद्धतीने करत असल्याचीदेखील टीका नवाब मलिक यांनी केली होती. त्यानंतर आता एनसीबीनं हा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! समीर वानखेडे यांना आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून हटवलं”
भाजपाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही- धनंजय मुंडे
“नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला”