आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर “येत्या 25 ऑक्टोबरपासून पुन्हा मराठा आरक्षणासाठी दौरा सुरू करणार आहे. दौऱ्याची सुरुवात रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर असा राहणार आहे.
आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत. त्यामुळे आता चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा राज्यभर दौरा काढण्याचे जाहीर केलं आहे. संभाजीराजे कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
हे ही वाचा- जरा लाज वाटू द्या; पुण्यातील ‘त्या’ घटनेवरून मनसे नेत्या रूपाली पाटील संतापल्या
राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यांनतरही पत्रव्यव्हाराला काही उत्तर नाही. पण त्यानंतर त्यांनी आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही. आम्ही गेल्या काही महिन्यांपासून शांत बसलो आहोत. यावर अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. शिक्षणामध्ये ओबीसीप्रमाणे आरक्षण द्या, अशी मागणी केली यावरही काही निर्णय नाही. याबाबत अनेकदा मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. नुसते कोरोनाचे कारण देत वारंवार आरक्षणाची बाजू पुढे ढकलण्यात आली. आरक्षणाप्रश्नी आता आमचे दौरे पुन्हा एकदा सुरू होणार आहेत., असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, कसलीही चाैकशी नाही, शांत झोप लागते; भाजपच्या ‘या’ नेत्याचं विधान
आगामी काळात भाजप या देशातूनच जमीनदोस्त होणार; नाना पटोलेंचा दावा
पुण्यातील ‘त्या’ घटनेवर अजित पवारांचा संताप अनावर; म्हणाले…