Home पुणे भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, कसलीही चाैकशी नाही, शांत झोप लागते; भाजपच्या ‘या’...

भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, कसलीही चाैकशी नाही, शांत झोप लागते; भाजपच्या ‘या’ नेत्याचं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजपमध्ये मी मस्त, निवांत आहे. शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही, काही नाही, असं विधान भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलं. हर्षवर्धन पाटलांच्या या विधानामुळं राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलंय.

हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून भाजपामध्ये आल्यानंतर त्यांनी आपण का भाजपमध्ये आलो याचे उत्तर यावेळी दिले. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

हे ही वाचा- आगामी काळात भाजप या देशातूनच जमीनदोस्त होणार; नाना पटोलेंचा दावा

आम्हालाही भाजपामध्ये जावे लागले. तो निर्णय मी का घेतला तेवढं मला विचारू नका. हे तुम्ही तुमच्या साहेबांना विचारा. पण आता भाजपामध्ये मी निवांत आहे. शांत झोप लागते. चौकशी नाही, फिवकशी नाही, काही नाही, असं मिश्कील उत्तर हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

पुण्यातील ‘त्या’ घटनेवर अजित पवारांचा संताप अनावर; म्हणाले…

पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटू तरूणीची हत्या प्रकरणी आरोपीला बेड्या; पुणे पोलिसांनी सांगितलं खुनाचं कारण

सावित्रीच्या लेकीसाठी महाराष्ट्र कधी बंद करणार?; पुण्यातील ‘त्या’ घटनेवरून चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल