Home महाराष्ट्र औरंगाबाद पालिकेवरचा भगवा उतरू देणार नाही, लवकरच संभाजीनगरला येणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद पालिकेवरचा भगवा उतरू देणार नाही, लवकरच संभाजीनगरला येणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : महापालिकेच्या वतीने नुतणीकरण झालेल्या संत एकनाथ नाट्यगृहाचे लोकार्पण आज करण्यात आलं.

शिवसेना नेते व औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी जुन्या गोष्टींना उजाळा दिला.

हे ही वाचा : पंकजा मुंडेंना बोलताना भान राहत नाही; धनंजय मुंडेंचा पलटवार

औरंगाबादकरांनी शिवसेनेवर कायम भरभरून प्रेम दिले. निवडणुकीच्या काळात आम्ही यायचो, तुम्हाला स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, वीज, उद्याने, नाट्यगृह देण्याचे आश्वासन द्यायचो आणि तुम्ही आम्हाला मतदान करायचा. तुम्हाला दिलेल्या प्रत्येक वचनाची मला आठवण आहे, इतर पक्षांसारखे आम्ही विसरलो नाही. त्यामुळेच अनेक वचनं आम्ही पुर्ण केली आहेत., असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

मराठवाडा संस्कृतीक मंडळाच्या मैदानावर झालेल्या विजयी सभा मला आजही आठवतात. 1987-88 पासून महापालिकेवर असलेला भगवा औरंगाबादकरांनी कधी खाली उतरू दिला नाही, यापुढेही तो कायम राहिल असा मला विश्वास आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण लवकरच औरंगाबाद शहरवासियांच्या दर्शनासाठी संभाजीनगरला येणार असल्याचं सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीची ताकद वाढणार; बार्शीचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?”

भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या ‘या’ स्टार प्रचारकाने केला भाजपमध्ये प्रवेश

किरीट सोमय्या म्हणजे भाजपची ‘आयटम गर्ल’; नवाब मलिक यांचं वादग्रस्त विधान