आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी बोलत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
आता आमचं हे काम राहील की, गावोगावी हा सैतान येता कामा नये, अशी जहरी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. शरद पवार यांच्याविरोधात भाजपनं मोठा सूड उगवला. त्यामुळे शरद पवार यांना गावगाड्यात यावं लागत आहे. जो पाप करतो त्याला येथेच फेडावं लागतं. शरद पवार यांना त्यांचं पाप फेडावं लागत आहे. हा सैदान गावगाड्यात परत येता कामा नये, हे आमचं काम राहील, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हंटलं होतं. यावरून आता राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदरणीय पवार साहेबांच्याबद्दल बोलताना अतिशय संतापजनक विधाने करणाऱ्या विधानपरिषदेचे माजी आमदार सदाभाऊ खोत यांचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते.
ही बातमी पण वाचा : “राष्ट्रवादीतल्या बंडावर, विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले, …तोपर्यंत व्हीपचा निर्णय…”
सदाभाऊ खोत यांनी आदरणीय पवार साहेबांबद्दल केलेलं वक्तव्य हे त्यांच्या बौद्धिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे. आपला आवाका आणि कुवत बघून त्यांनी बोलावं., असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.
राष्ट्रवादी काय आहे हे आपण सांगण्याची गरज नाही, ज्या माणसाला पक्ष स्थापन करून ४ कार्यकर्ते जमवता आले नाहीत त्यांनी देशाच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या आदरणीय पवार साहेबांवर बोलायची गरज नाही. , असं प्रत्युत्तर रूपाली चाकणकर यांनी यावेळी सदाभाऊ खोत यांना दिलं.
आदरणीय पवार साहेबांच्याबद्दल बोलताना अतिशय संतापजनक विधाने करणाऱ्या विधानपरिषदेचे माजी आमदार सदाभाऊ खोत यांचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते.
सदाभाऊ खोत यांनी आदरणीय पवार साहेबांबद्दल केलेलं वक्तव्य हे त्यांच्या बौद्धिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे. आपला आवाका आणि कुवत बघून त्यांनी…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 9, 2023
महत्त्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधारपदी विराजमान?”
“मोठी बातमी! पुण्यात पंतप्रधान मोदी, अजित पवार-शरद पवार ‘या’ दिवशी एकाच मंचावर एकत्र येणार?;”
सत्तेसाठीभाजप वाट्टेल ते करतं; सामनातून भाजपवर टीका