आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगोला : पंचायत राज समितीचे पथक आज सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये आमदार अनिल पाटील, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार किशोर दराडे व आमदार सदाभाऊ खोत होते.
आमदार सदाभाऊ खोत यांची गाडी पंचायत समितीच्या आवारात आली. गाडीमधून आमदार सदाभाऊ खोत उतरताच मांजरी (ता. सांगोला) येथील हॉटेल चालक व ग्रामपंचायत सदस्य अशोक शिनगारे यांनी ‘भाऊ, तुमचे तालुक्यात स्वागत. परंतु लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीतील माझी उधारी तेवढी अगोदर द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जावा. आधी आमचा निर्णय लावा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही, असं म्हणत हॉटेल चालक अशोक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांच्याशी हुज्जत घातली.
हे ही वाचा : “काँग्रेसची मोठी खेळी; ‘या’ विधानपरिषद निवडणूकीत भाजपला दिला पराभवाचा धक्का”
दरम्यान, हॉटेलचालक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांना अडविल्याने पंचायत समिती परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यात सदाभाऊ खोतांनाही काय बोलावे सुचेना. मात्र, सदाभाऊ खोत यांनी या हाॅटेल मालकाची कशीतरी समजूत काढून स्वतःची सुटका करून घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“…मग 2 वर्ष काय फक्त टोमण्यांमध्ये गेले का?”; मनसेचा सवाल
गोपाळकृष्ण शाळेत मोठ्या दिमाखात ‘ प्रवेशोत्सव ‘ साजरा
मध्यरात्री मनसेचे वसंत मोरे यांनी लेकूरवाळीला केली ‘ही’ मदत; PMPL वाहकाला आणि चालकाला केला सलाम