“रुपालीताई, माझ्या जीवाला धोका आहे, मला घेऊन चला; भाजप खासदाराच्या सुनेची विनवणी”

0
732

मुंबई : वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. तसंच त्यांनी रडत रडत व्हिडीओ शूट करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे त्यांनी मदतीसाठी विनंती केली आहे.

रूपाली चाकणकर यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुन यांना गेली अनेक दिवस हे तडस कुटूंब मारहाण करून अत्याचार करीत आहेत.पुजाचा आताच हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला, तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलिस सरंक्षणासाठी पोहचले आहेत. , असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं.

दरम्यान, हा व्हिडीओ भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांचा असल्याचा दावा रूपाली चाकणकर यांनी केला आहे. तसेच या व्हिडीओतील महिला म्हणते, “मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते.”

महत्वाच्या घडामोडी –

परळी आहे सुन्न, मान खाली गेली आहे राज्याची; करूणा शर्मा प्रकरणी पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

“लाचखोर नवऱ्याच्या बायकोचे नाव वाघ असले म्हणून, मांजर वाघ होत नाही”

शिवसेना आणि संजय राऊत तोंडावर पडले; बेळगाव निकालानंतर निलेश राणेंचा घणाघात

“हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करून लाज वाटली नाही का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here