मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत.
मेहबूब शेख यांनी बोलताना चित्रा वाघ यांना टोला लगावला होता. लाचखोर नवऱ्याच्या बायकोचे नाव वाघ असले म्हणून मांजर वाघ होत नाही. तुमच्या नवऱ्याने कशात आणि कोणत्या प्रसंगात लाच घेतली यावर अधिक स्पष्टपणे बोला. मेलेल्या माणसाच्या वारसांना नोकरी आणि मदत देण्यासाठी किशोर वाघ यांनी लाच घेतली, हे तुम्ही राज्यातील जनतेला सांगा, असं मेहबूब शेख यांनी म्हटलं होतं. यावर आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मला व माझ्या परीवारासाठी गलीच्छ भाषा वापरली जातीये तरी ही.. मी कुणा परीवारातील सदस्यांना बलात्कार्याची बायको बलात्कार्याची मुलं म्हणून कधीही हिणवणार नाही कारण आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही विरोधकांकडे मुद्दे संपले कि तिच्या बाईपणाला व तिच्या परीवाराला टार्गेट केलं जात, असं जोरदार प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांना यावेळी दिलं.
पण मला हे करण्याची आवश्यकता नाही माझ्याकडे सत्ताधार्यांना गुद्दे द्यायला बरेचं मुद्दे आहेत मला राज्यातील तमाम भगिनींना सांगायचयं… या भ्याड भेकडांना भीक न घालता कणखर बना अन्यायाविरोधात पेटून उठा मी तुमच्यासोबत आहे आवाज उठवतीये व उठवत रहाणार चं…!!जय हिंद !! जय महाराष्ट्र !!, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
पण मला हे करण्याची आवश्यकता नाही माझ्याकडे सत्ताधार्यांना गुद्दे द्यायला बरेचं मुद्दे आहेत
मला राज्यातील तमाम भगिनींना सांगायचयं…
या भ्याड भेकडांना भीक न घालता कणखर बना…अन्यायाविरोधात पेटून उठा मी तुमच्यासोबत आहे
आवाज उठवतीये व उठवत रहाणार चं…!!जय हिंद !! जय महाराष्ट्र !!
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 8, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“रुपालीताई, माझ्या जीवाला धोका आहे, मला घेऊन चला; भाजप खासदाराच्या सुनेची विनवणी”
परळी आहे सुन्न, मान खाली गेली आहे राज्याची; करूणा शर्मा प्रकरणी पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला
“लाचखोर नवऱ्याच्या बायकोचे नाव वाघ असले म्हणून, मांजर वाघ होत नाही”
शिवसेना आणि संजय राऊत तोंडावर पडले; बेळगाव निकालानंतर निलेश राणेंचा घणाघात