Home महाराष्ट्र मुलुंडमध्ये 5000 खाटांच्या कोव्हिड रुग्णालयासाठी 12 हजार कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर...

मुलुंडमध्ये 5000 खाटांच्या कोव्हिड रुग्णालयासाठी 12 हजार कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

मुंबई : मुलुंड येथे 5,000 खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारणीसाठी 22 एकर जमीन खरेदी करताना 12 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी केला आहे. यासंदंर्भात किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत राज्यपालांना निवेदन दिलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांना मुंबईत 5 हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी तातडीने 22 एकर जागा अधिग्रहित करण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना कोणत्याही पातळीवर चर्चा झाली नव्हती, रुग्णालय उभारण्याबाबतचा आवश्यक तो अहवालही तयार करण्यात आला नव्हता, असं निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी जमीन अधिग्रहित करण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले. या सर्व प्रक्रियेत, कोणती जमीन अधिग्रहित करायची याचा निर्णय आधीच झाला असावा. त्यानुसार मुलुंड येथील जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया अत्यंत जलदगतीने पार पाडली गेली, असे सोमय्या यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“कॅन्सरवर मात केलेल्या मुन्नाभाईचा न्यू लुक सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल”

चंद्रकांत पाटलांनी मागच्या काळात निर्माण केलेल खड्डेच बुजवतोय; अशोक चव्हाणांचा टोला

बेन स्टोक्स-संजू सॅमसनची वादळी खेळी; राजस्थान राॅयल्सची किंग्स इलेव्हन पंजाबवर 7 विकेट्सनी मात

“उर्मिला मातोंडकरांनी स्वीकारली शिवसेनेची ऑफर”