आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतरचा अनुभव रोहित पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे. या वाक्याची प्रचिती आली आणि रोहित तू बिनधास्त जा. तू सांगितलेलं काम झालंच असं समज” हे वाक्य धीराचे होते, असं रोहित पाटील नितीन गडकरींच्या भेटीनंतर म्हणाले आहेत.
हे ही वाचा : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेनंं पुन्हा डिवचलं; शिवसेना भवनसमोर केली बॅनरबाजी
कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी नागज- सांगोला महामार्ग येथे ब्रीज अंडरपास उपलब्ध करून दिला जावा आणि सदरचा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ग्राह्य धरला जावा, अशी विनंती रोहित पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिल्लीत भेट घेऊन केली. यावेळी गडकरी यांनी या कामांसाठी त्यांनी सकारात्मक दृष्टीने निर्देश देत लवकरच हे दोन्ही कामे होतील अशी हमी दिली, असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.
“दिल्ली मध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे” ह्या वाक्याची प्रचिती आज आली.
“आणि रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेलं काम झालं असं समज” हे वाक्य धीराचे होते.
आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांबाबत चर्चा केली. pic.twitter.com/mKJqVmRwIf— Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) April 5, 2022
महत्वाच्या घडामोडी –
“मशिदीवरील भोंग्याच्या आदेशावरून मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे नाराज”
“मशिदीवरील भोंग्याच्या आदेशावरून मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे नाराज”
“ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत, नितीन गडकरी शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनास एकत्र; चर्चांना उधाण”