आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोलकाता : आज भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 6 विकेट्सने पराभव केला.
भारताने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावत 157 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून निकोसल पूरनने सर्वाधिक 43 चेंडूत 61 धावांची विस्फोटक खेळी केली. पूरनने या खेळीत 4 चाैकार व 5 षटकार ठोकले. तसेच कायरन पोलार्डने 19 चेंडूत 24 धावांची नाबाद खेळी करत संघाला 157 धावांपर्यंत नेऊन पोहचवलं.
हे ही वाचा : ईडीवर बोलू नको, बिडी प्यायला लावतील; नारायण राणेंचा संजय राऊतांना टोला
दरम्यान, धावांचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य 18.5 षटकात 4 विकेट गमावत सहज पूर्ण केलं. भारताकडून रोहित शर्मा व इशान किशननं 7.3 षटकात 64 धावांची विस्फोटक सलामी दिली. रोहितनं 19 चेंडूत 40 धावांची वेगवान खेळी केली. ज्यात 4 चाैकार व 3 षटकारांचा समावेश होत. तर इशानने 42 चेंडूत 35 धावांची खेळी केली. तसेच शेवटी सुर्यकुमार यादव व वेंकटेश अय्यरनं 43 धावांची नाबाद भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. सुर्यकुमारनं 18 चेंडूत 34 धावा तर वेंकटेश अय्यरनं 13 चेंडूत 24 धावांची शानदार खेळी केली. तर वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेजने 2 तर काॅट्रेल व फॅबियन ऐलनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
“काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं फडणवीसांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश”
“…म्हणून नारायण राणेंनी भाजपासमोर लाचारी पत्कारली ”; शिवसेनेचा पलटवार
नारायण राणे म्हणाले राऊत राष्ट्रवादीचे; आता संजय राऊत, म्हणतात…