अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तीस लाखाचे बक्षीस जाहीर केले. मात्र असे बक्षीस जाहीर करणे म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे अशी टीका भाजप नेते राम शिंदे यांनी केली होती. त्याला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बक्षीस जाहीर करण्यापाठीमागे माझा प्रामाणिक हेतू होता की गावकऱ्यांनी तट तट विसरुन विकासाचं राजकारण करावं, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, त्यांना विकासचं काम कळत नसेल. त्यांना गटतट कळत असतील तर त्याला मी काय करु, असा टोलाही रोहित पवार यांनी राम शिंदे यांना लगावलाय.
महत्वाच्या घडामोडी-
कोल्हापूर! अंबाबाईच्या मुखदर्शनासाठी महाद्वार उघडणार; दर्शन वेळेतही वाढ
“महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात भाजप कधीच यशस्वी होणार नाही”
ईडीचे ऑफिस आता मोदींच्या घरातून चालतं; बच्चू कडूंचा मोदी सरकारवर हल्लाबोल
सीरम इन्स्टीट्यूटच्या सायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या; मनसेची मागणी